महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahaparinirvan Din : पुरेशा सुविधा नसल्यास पालिका अधिकाऱ्यांना ‘इंगा’ दाखवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

एस. व्ही. यू. मुंबई : “गेल्या दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधा आणि उणिवांविषयी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आहोत. तरीही कोणतीही ठोस सुधारणा झालेली दिसत नाही,” अशी टीका करत महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांना पुरेशा आणि दर्जेदार सुविधा न दिल्यास पालिका अधिकाऱ्यांविरोधात ठोकशाही करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उद्या दादर चैत्यभूमीवर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : मीरा-भाईंदर निवडणुकीत भाजप ‘स्वबळावर’?

मुंबई – राज्यात महायुतीची सत्ता असली—भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस—तरीही आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः, मीरा-भाईंदर महानगरपालिका ही भाजपच्या गोटात स्वबळाचा नारा अधिक ठळकपणे घुमत आहे. भाजपचे वजनदार नेते आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदर मनपेत शिंदे यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुती सरकारने वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका सादर करावी :  काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असताना “सरकार पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून स्वतःची पाठ थोपटत आहे, पण जनतेच्या हाती निराशाच आली आहे” अशी टीका करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला एक वर्षाच्या कामगिरीची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, “सरकार उपलब्धीची यादी मिरवत असले तरी वास्तव वेगळे आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या

Bombay Hight Court : हायकोर्टाचे नामकरण ‘मुंबई उच्च न्यायालय’ करा; सुनील प्रभू यांची मागणी

iमुंबई – बॉम्बे हायकोर्टचे नामांतर करून ते अधिकृतपणे ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे घोषित करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी शिवसेना नेते आणि विधानसभा प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. प्रभू यांनी आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विशेष शासकीय ठराव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र टीका

मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sunil Tatkare : “दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करणे हा त्यांचा आयुष्यभराचा धंदा” — खा. सुनील तटकरे यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर झोड

By Nalawade मुंबई — “माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत आणि त्याच्याशी माझा दूरान्वये संबंध नाही. पण स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करत फिरायचं—हा त्यांचा आजपर्यंतचा धंदाच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही […]

लेख

महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!

By: विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवाभाऊची आर्थिक शिस्त आणि शिवसेनेला उतरती कळा 

X:  @vivekbhavsar राज्यात मंगळवारी नगरपालिका आणि नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील वर्षात 31 जानेवारीअखेर सर्व शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकिया संपवून लोकनियुक्त प्रतिनिधीच्या हातात कारभार जाणे सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत आहे, तसा आदेश आहे. कुठलीही स्थानिक स्वराज्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“या निवडणुकीत फक्त पैशांचा पूर नव्हे तर अतिवृष्टीचे दर्शन!”: उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर तोफेची झोड

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यभर तापवला असताना, प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे खास पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर ठाकरी शैलीत जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री एकमेकांवर आरोपांची फेकाफेक करत राज्यभर आपलेच वाभाडे काढत आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादी–भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी प्रवीण दरेकर महाडमध्ये; प्रचाराला वेग

महाड — ऐतिहासिक महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीमुळे प्रचाराला रंगत आली असून, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर दोन दिवस महाडमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे महाडमधील निवडणूक प्रचाराला मोठी गती मिळणार असल्याची चर्चा […]