महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात HMPV संसर्गाचा धोका – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलर्टची शक्यता

चीनमध्ये पसरलेल्या ह्यूमन मेटा प्यूमो व्हायरस (HMPV) या संसर्गाचा पहिला प्रकरण भारतात समोर आले असून, बंगळुरूतील आठ महिन्याच्या मुलीला या विषाणूची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात HMPV चा प्रसार होण्यापूर्वीच दक्षता घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीत अलर्ट जारी करण्याची शक्यता आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. HMPV विषाणूचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य- राज्यपाल पत्रकार संघटनेने यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्यवेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशात एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने लक्षणीय यश देत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षविस्ताराची प्रक्रिया जोमाने सुरू राहील आणि कोणतीही कसूर होणार नाही, अशी रोखठोक भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश: ‘सर्वांसाठी घरे’ योजना प्रभावीपणे राबवावी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा अशी सूचन केली. ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना राबवताना नागरिकांना म्हाडा आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज लाभ मिळावा, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. यासाठी महिन्याभरात सविस्तर धोरण तयार करण्यात येईल. राज्य सरकारकडून गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधण्यात […]

मुंबई ताज्या बातम्या

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय महायुती सरकारचा मोठा निर्णय मुंबई : शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी, ज्याला आकारी पड जमिनी म्हणतात त्या पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा अतिशय महत्वपूर्ण व मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना […]

महाराष्ट्र

नववर्षारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत

गडचिरोली, 1 जानेवारीनवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

किती प्रकल्प करतो यापेक्षा आपण कसे शासन करतो हे महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवाल २०२४’चे अनावरण करण्यात आले. मुख्य सचिव, संबंधित विभागांचे अधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनावर विशेष भर देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे शासन पारदर्शक, कार्यक्षम आणि लोककेंद्रीत करण्यावर भर दिला. यानुसार महाराष्ट्रामध्ये नागरिकांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी – धनंजय मुंडे

या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव – धनंजय मुंडे मुंबई – मसाजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे: नाना पटोले

नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर राहुल गांधी यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह रचून बदनाम करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, संसदेत झालेल्या घटनेचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही, आणि गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे. पटोले म्हणाले की, भाजप राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेची लोकप्रियता […]