Elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती–आघाडीविरहित एकत्र लढवाव्यात – ॲड. (डॉ.) सुरेश माने
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या असून, जानेवारी 2026 मध्ये उर्वरित सर्व निवडणुका—महानगरपालिकांसह—होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय चित्र स्पष्टपणे दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले आहे. काँग्रेसप्रणीत चार–पाच पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वाची लढाई लढत आहे, तर भाजपप्रणीत चार–पाच पक्षांची महायुती वर्चस्वासाठी मैदानात उतरली आहे. परिणामी, महाराष्ट्रात राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे. […]
