महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘IIT Bombay’ म्हटले तर ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न!’ — राज ठाकरे यांचा भाजपवर आरोप

मुंबई — केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘IIT Bombay’ संदर्भात केलेल्या विधानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आयआयटीच्या नावात “मुंबई” न ठेवता “बॉम्बे” ठेवणे योग्य ठरले’ या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याला ठाकरे यांनी “मुंबईला महाराष्ट्रापासून दूर नेण्याचा प्रयत्न” असे संबोधत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेबरोबर युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही — हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर (मनसे) संभाव्य युतीबाबत सुरू झालेल्या चर्चांवर अखेर काँग्रेसने अधिकृत खुलासा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मनसेसोबत युती किंवा आघाडीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमधील आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने अधिकृतपणे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुबार मुस्लीम मतदारांवर मविआ व मनसे मौन; राज ठाकरे यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं — आशिष शेलार

8 वर्गीकरणातील मतदार यादी सादर; 31 मतदारसंघांतील 2.25 लाख संभाव्य दुबार मतदारांची BJPची माहिती मुंबई : “राज ठाकरे मराठी, हिंदू आणि भूमिपुत्र मतदारांच्या दुबार नोंदी शोधतात, पण अनेक मतदारसंघात दिसणारे मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत. राज ठाकरे आणि मविआ दोघांनाही ‘व्होट जिहाद’चे दुखणे आहे,” असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS : डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ‘चांदभाई’चं ग्रहण – राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा महिलांना सुरक्षित ठेवा : राज ठाकरे

X : @NalawadeAnant मुंबई – जनतेच्या पैशातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा राज्यातील महिलांना आधी सुरक्षित ठेवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray) यांनी बुधवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा सुरक्षित नसेल तर इतर ठिकाणची अवस्था काय असेल, असे सांगत ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर थेट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे कोकणात शिंदे सेना – राष्ट्रवादी विरोधात “या” मतदारसंघात उमेदवार देणार!

X : @milindmane70 मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे (Assembly election) बिगुल वाजवले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची व्यूहरचना केली आहे. मनसेने (MNS) महाराष्ट्रात 288 पैकी 200 ते 225 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची माहिती मनसेचे कोकणचे सरचिटणीस आणि मुखेडचे माजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघातुन मनसेची माघार ; भाजपचे निरंजन डावखरेंच निवडणूक रिंगणात !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Graduate Constituency) रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी ‘सशर्त’ पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत पुन्हा वादंग ? राज ठाकरेंच्या भेटीसाठी आशिष शेलार शिवतीर्थवर !

मुंबई :लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा आज धडाका लावला आहे . उद्या सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत .आता या निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली पुन्हा एकदा महायुती (mahayuti) व महाविकास आघाडीत (mva )आरोप प्रत्यारोप होत आहेत .अशातच आता भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या मनसेने (mns […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्यात राज ठाकरेंची खेळी ; कोकण पदवीधर मदारसंघासाठी अभिजित पानसेंना उमेदवारी !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत . अशातच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Konkan Graduate Constituency Election) अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या या खेळीमुळे भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ? मनसैनिकांनी दिले संकेत

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत .अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी मुंबईतील शिवाजी […]