विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोल लेण्यांत पर्वत दिन; सह्याद्री मित्र संस्थेचा उपक्रम
महाड – महाडजवळील कोल गावातील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरात यावर्षीचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पर्वत संवर्धन आणि मानवजातीशी पर्वतरांगांचे नाते अधोरेखित करणारा हा दिवस युनेस्कोच्या अन्न व कृषी विभागातर्फे जगभर साजरा केला जातो. यंदाचा जागतिक पर्वत दिन “जगाला शुद्ध पाणी, ऊर्जा आणि अन्न पुरवणाऱ्या हिमनद्यांचे संवर्धन” या […]
