गणेशोत्सव २०२६ साठी कोकणात जाणाऱ्या पात्र वाहनाला कोकण दर्शन पासद्वारे टोलमाफी मिळतानाचे प्रतीकात्मक चित्र, पार्श्वभूमीत अटल सेतू मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

गणरायाच्या वाटेवर ‘टोल’चा अडसर दूर…!

कोकणच्या गणेशभक्तांना सरकारचा दिलासा; ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान प्रमुख मार्गांवर पथकरमाफी अटल सेतूचाही समावेश; ‘कोकण दर्शन’ पास जाण्या-येण्यासाठी वैध, एसटी बसनाही लाभ मुंबई — गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या प्रवासातील टोलचा आर्थिक भार यंदाही हलका होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या पात्र […]

वर्सोवा-बांद्रा सी लिंक प्रकल्पाची डेडलाइन 2024 वरून 2028 पर्यंत वाढल्याचे दर्शवणारे प्रतिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

वर्सोवा-बांद्रा सी लिंकची डेडलाइन २०२८ पर्यंत लांबली; चार टप्प्यांत तब्बल १,४२१ दिवसांची मुदतवाढ

मूळ पूर्णत्वाची तारीख जून २०२४; आता मे २०२८ पर्यंत मुदत — कंत्राटदाराची जबाबदारी, ‘लिक्विडेटेड डॅमेजेस’ आणि आर्थिक परिणामाची माहिती जाहीर करण्याची अनिल गलगलींची मागणी Anant Nalawade मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी सेतू प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुदत चार टप्प्यांत मिळून तब्बल १,४२१ दिवसांनी वाढवण्यात आली असून, मूळ २१ जून २०२४ची डेडलाइन आता १७ मे २०२८ पर्यंत पुढे गेली […]

महाराष्ट्रातील ५०० कोटींवरील पायाभूत प्रकल्पांसाठी कंत्राटदारांच्या कामगिरीचे Green, Yellow आणि Red रेटिंगद्वारे मूल्यांकन दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोठ्या कंत्राटदारांवर आता ‘परफॉर्मन्स’ची टांगती तलवार!

५०० कोटींवरील प्रकल्पांसाठी नवी नियमावली; १०० गुणांचे मूल्यांकन, गुणवत्तेला सर्वाधिक ६० गुण………! मुंबई  — महाराष्ट्रातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये निकृष्ट काम, विलंब आणि कंत्राटदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे ५०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांच्या प्रत्यक्ष कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्यांना ‘ग्रीन, यलो आणि रेड’ असे रेटिंग […]

विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील शासकीय जमिनीचे सर्वेक्षण आणि आराखड्यांचा आढावा घेत असलेले अभियंते व एमएसआरडीसी अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरार–अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती; पालघरमधील शासकीय जमीन एमएसआरडीसीकडे हस्तांतरित

वसईतील ०.२८.७० हेक्टर जमीन नाममात्र दराने उपलब्ध; प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचा टप्पा मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारने आणखी गती दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील शासकीय जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली […]

Entrance of the Mumbai Pune Missing Link tunnel project in the Sahyadri hills महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे–मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा सह्याद्री प्रवास

दख्खनच्या पठाराला कोकण किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. पण माणूस भिंतींना भेदण्यासाठीच मार्ग शोधत आला आहे. त्या जिद्दीमधून निर्माण झाले घाटमार्ग. त्यापैकी भोर घाट हा सर्वात महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि सतत वापरात राहिलेला मार्ग ठरला. आज काही तासांत पूर्ण होणारा पुणे–मुंबई प्रवास पूर्वी अनेक दिवसांचा असे. या प्रवासाची कथा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील “मिसिंग लिंक”चे काम लवकरात लवकर पूर्ण करा…!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीचे निर्देश मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील बोरघाटात मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा एक अवजड टँकर अचानक तोल जाऊन पलटी झाला. या अपघातामुळे तब्बल २२ तासांहून अधिक काळ भीषण वाहतूक कोंडी झाली. या गंभीर घटनेची दखल घेत बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्राला लॉजिस्टिक धोरणातून पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार!

X : @NalawadeAnant मुंबई – महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला (Maharashtra Logistic Policy-2024) आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने (Maharashtra State Economic Advisory Council) केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणी प्रश्नावर श्वेत पत्रिका काढा : आशिष शेलार 

X : @therajkaran मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-नाशिक महामार्गाचे कामयुद्धपातळीवर पूर्णत्वाला न्या : अजित पवार

X : @NalavadeAnant मुंबई मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत असल्याने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, असे […]

ताज्या बातम्या मुंबई

ठाण्यात तरुणीला मारहाण; चर्चा करा: अंबादास दानवे

X : @NalavadeAnant नागपूर ठाण्यात तरुणीला (Thane incident) गाडीने जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आल्याने पीडित तरुणीवर सर्वच स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी मंगळवारी सदर तरुणीला न्याय मिळावा, या मागणीसाठी २८९ अनव्ये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली.  एमएसआरडीसी (MSRDC) […]