ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दिग्गज निघून गेल्यानं तुमचं प्रमोशन झालं’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘अजित पवार 4 महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताई पाटलांच्या दाव्याने खळबळ

मुंबई अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करीत स्वत:ची वेगळी चूल मांडली, यावर माजी खासदार आणि दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. पुन्हा एकदा शालिनीताई यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार गटाकडून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान शालिनीताई यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीड हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

X: @therajkaran बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षातील असोत, कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.    या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सदस्य संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीने पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावरुन विद्यार्थ्यांची निदर्शनं

नागपूर सरकारच्या विविध संस्थांमार्फत पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यंदा सारथीमधून पीएचडीच्या विद्यार्थ्यांची संख्या २०० वर करण्यात आली आहे. जाहिरात दिल्याच्या सहा महिन्यांनंतर हा बदल करण्यात आला असून आधीच तब्बल १३०० विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केल्याचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नवा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात अंबादास दानवे ऑक्सिजन मास्क घालून विधीमंडळात

नागपूर राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करणार, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला. गळ्यात स्टेथोस्कोप व तोंडाला ऑक्सिजन मास्कमंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी, रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘प्रिय बाबा…’ शरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंचं भावुक करणारं पत्र, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मुंबई महाराष्ट्राचे चाणक्य मानले जाणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. ’83 वर्षांचा तरुण योद्धा’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला जात आहे. दरम्यान शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची लेक सुप्रिया सुळे यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. https://www.facebook.com/share/p/aHAsYJ7sK9awrNbF/?mibextid=aubDjK सुप्रिया सुळेंची […]

महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत सरकारकडे मागणी

नागपूर दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने बळीराजाला कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळी तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसूली मंडळांना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज […]