ताज्या बातम्या

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

मुंबई साधारण दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला आणि शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. तेव्हापासून राजकीय डावपेच, हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहे. आज त्याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करतील. आणि दोन्ही गटाच्या आमदारांचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल. शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यात शिंदे गटाचे १६ तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेसमधून माझं निलंबन; जिचकरांचा धक्कादायक आरोप

नागपूर काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर शिस्तपालन समितीने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून सहा वर्षांकरिता हकालपट्टी केली आहे. यानंतर जिचकरांनी पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर धक्कादायक आरोप केला आहे. भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेस मधून माझे निलंबन करण्यात आलं आहे. मी नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आश्रमशाळा अत्याचार प्रकरण; आरोपींना चार वेळा जन्मठेप, पीडितांना न्याय दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार – डॉ. नीलम गोऱ्हे

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग संस्थापक पवार यांनी केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार (६६, रा.मांगले ता.शिराळा) याच्यासह आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकीण मनिषा शशिकांत कांबळे (४६, रा.चिकुर्डे, ता.वाळवा) या दोघांना न्यायालयाने एकाच गुन्ह्यामध्ये ४ वेळा जन्मठेपीची शिक्षा ठोठावली. यावेळी न्यायालयाने ४ पीडित मुलींना दंडातील ५० हजार रक्कम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आमदार अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू, सरकार कोसळणार की राहणार? उद्या काय घडू शकतं?

मुंबई सर्वोच्च न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी दिलेल्या निर्णयानंतर तब्बल आठ महिन्यांनी उद्या १० जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल लागू शकतो. या निकालानंतर सरकार राहणार की कोसळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला. उद्या या सरकारची अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं जात आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्वसामान्यांना दिलासा – शरद पवार

मुंबई बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निकालाचे मी स्वागत करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात हा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच गुजरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

…तर शंकेला वाव, आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवारांचा आरोप

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरुन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हल्ला केला जात आहे. दरम्यान शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोपींना भेटणाऱ्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करणार? नार्वेकर-शिंदेंच्या भेटीवरुन ठाकरे कडाडले!

मुंबई मे २०२३ मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आमदार अपात्रतेची केस दाखल केली होती. त्यावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीवरुन संताप व्यक्त केला. शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीमागे मिलिभगत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. निकालापूर्वी न्यायाधीश आणि आरोपींची भेट बेकायदेशीर असते. दोन वेळा अशा भेटी झाल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादांचं चॅलेंज पुत्र पूर्ण करणार? शिरूरच्या मैदानात अमोल कोल्हे विरूद्ध पार्थ पवार…

पुणे शिरूर मतदारसंघाची जागा आपण जिंकून दाखवतोच, अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आता दोन्ही गटासाठी शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला आहे. अजित पवार शिरूर मतदारसंघातून कोणाचं नाव पुढे करणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांचे पूत्र पार्थ पवारांचं नाव समोर आलं आहे. आज ९ जानेवारी रोजी पार्थ अजित पवार यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या घरी ईडीची छापेमारी

नवी दिल्ली उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. आतापर्यंत सात ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे १० ते १२ अधिकारी वायकरांच्या घर दाखल झाले आहेत. सकाळी साडे आठ वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘चोर तो चोर, वर शिरजोर’; तलाठी भरती घोटाळा प्रकरणी विखेंच्या वक्तव्याने उमेदवारांचा संताप

मुंबई तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही, तरी आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्यानंतर उमेदवारांचा पारा चढला. ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ अशा शब्दात उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला. तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज […]