ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘न्याय का हक मिलने तक…’ भारत जोडो न्याय यात्राचा टीझर रिलिज

१४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे. आज त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेत ‘या’ महिला खासदारांचे तिकीट कापणार?

मुंबई लोकसभा निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी दिली जावी याबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना या ५ महिला खासदारांचं तिकीट कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच लोकसभेत महिला खासदारांची संख्या तुलनेत कमी असताना आता सध्या खासदार असलेल्या या ५ महिला नेत्यांना पुढची टर्म राहणं अशक्य ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या भाजप समर्थित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोलिसावर हात उचलणं भाजप आमदाराला भोवलं; सुनील कांबळेंविरोधात गुन्हा दाखल

पुणे स्टेजवरुन उतरत असताना अडखळल्यावर सावरत असताना धन्यवाद मानण्याऐवजी कानशिलात मारणारे भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदार शिवाजी सरक (३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी स्टेजवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेसाठी राज्यातील महायुतीचे संभाव्य उमेदवार, दिग्गज उतरणार मैदानात? पाहा यादी!

मुंबई महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुतीने लोकसभेत महाराष्ट्रात ४५ पार जाणार असल्याचं संकल्प केला आहे. त्यामुळे भाजपने कंबर कसली असून यंदा कोणाकोणाला रिंगणात उतरवणार याबाबत अंदाज बांधला जात आहे. लोकसभेत ४०० हून जास्त जागांचा नारा भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. निवडणूक चुरशीची असल्यानं भाजपातील दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हिंदूत्वाची लढाई शिगेला; पंतप्रधान अयोध्येत तर उद्धव ठाकरे काळा राम मंदिरात, 22 जानेवारीला काय घडणार?

नाशिक २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करीत असताना इकडे उद्धव ठाकरे नाशिकमधील काळा राम मंदिरात पूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च १९३० रोजी अस्पृश्यांचा प्रवेशासाठी याच मंदिरात सत्याग्रह करण्यात आला होता. उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिराचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. परिणामी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण सल्लागार अध्यक्षांना महिन्याला साडे 4 लाख मानधन अन् सुविधांचा वर्षाव

मुंबई राज्य सरकारसाठी सध्या मराठा आरक्षणाचा पर्याय शोधून काढणं अत्यंत गरजेचं ठरलं आहे. यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांवर सुविधांचा वर्षाव करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षांमा महिना साडेचार लाख मानधन आणि सदस्यांना चार लाख मानधन, विमान प्रवास भाडे, वाहन, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुन्हा 2004 चा फॉर्म्युला? सोनिया गांधींची रणनीती पुन्हा होईल यशस्वी?

नवी दिल्ली लोकसभा निवडणूक आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात आज बैठक घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित होते. याशिवाय राज्यांमधील काँगेसच्या नेत्यांनाही बोलावण्यात आलं होतं. २०२४ च्या निवडणुकीत २००४ च्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी काँग्रेसकडून दर्शवली गेली आहे. अशात २००१ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मागास आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील पावणेतीन लाख कुटुंबांचं सर्वेक्षण

बीड राज्य मागास आयोगाला मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम दिलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्य मागास आयोगाकडून बीड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी ३ हजार ४७९ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काल फटकारलं आज त्याच ‘घरभेदी’ची पाठराखण; रोहित पवारांच्या कंपनीवरील धाडेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई जितेंद्र आव्हाडांच्या रामाविषयीच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन टीका केली होती. त्यानंतर आज सकाळी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडल्यानंतर शेवटी जितेंद्र आव्हाड मदतीसाठी धावुन आले. जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांची पाठराखण केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचे हे त्याचं फळ आहे.वाईट याचेच वाटते की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व मराठवाड्यासाठी वैधानिक विकास महामंडळ […]