ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोलिसाच्या कानशिलात लगावली, पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळेंचं धक्कादायक कृत्य

पुणे पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी या मागणीला जोर आला आहे. पुण्यातील या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, आमच्यात मतभेद नाहीत’; राऊतांनी स्पष्ट केलं

मुंबई मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत, निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. जो न्याय अदानींना मिळतो, देशातील जनतेला का मिळत नाही, हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजनसोबत चर्चा सुरू असून ती सकारात्मक पातळीवर असल्याचं राऊतांनी यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड

बारामती आताची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकली आहे. यापूर्वीही गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या बारामती येथील प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केल्याचं समोर आलं होतं. यावेळी पाठवलेल्या नोटीसमध्ये ७२ तासांत प्लांट बंद करण्याच्या सूचना देण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाचे अनिल देसाई लोकसभेच्या रिंगणात? एकाच मतदारसंघात तीन पक्ष आग्रही असल्याची चर्चा

मुंबई उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई लोकसभा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आघाडीतील काँग्रेसही या जागासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ सोडण्यास ठाकरे गट तयार नसल्याचंही सांगितल जात आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या वाटेवर असलेले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रदेश काँग्रेस कार्यालयातील प्रशासन व संघटन विभागाची जबाबदारी नाना गावंडे व प्रमोद मोरेंकडे

मुंबई काँग्रेसचे पक्षाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे तसेच प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयातील प्रशासन व संघटन विभागाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या दोघांवर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. नाना गावंडे यांचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात चांगला जनसंपर्क […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मणिपूर ते मुंबई :15 राज्यं, 6700 किमी प्रवास; कसा असेल भारत जोडो न्याय यात्राचा रूट मॅप?

नवी दिल्ली १४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुधाला ५ रु. प्रति लिटर अनुदान, रेशीम उद्योग विकासांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने जाहीर केला मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयांवर निर्णय सुनावला आहे. याबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं शिंदेंनी घोषित केलं आहे. याशिवाय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आयकर विभागातील 1200 पैकी केवळ 3 पदे मराठी तरुणांना, नोकऱ्या महाराष्ट्रात भरती परप्रांतीयांची; शिवसेनेचा केंद्राला जाब

मुंबई आयकर विभागातील १२०० पैकी केवळ ३ पदे मराठी तरुणांना मिळाली आहेत. केंद्राला महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची कार्यालयं थाटायची आहेत का, असा सवाल शिवसेनेने केंद्राला केला आहे. शासकीय नोकरी महाराष्ट्रात पण त्यात एक टक्काही मराठी तरुणांना संधी नसल्याचं उघड झाल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. या प्रकरणात रेल्वे महामंडळाला पत्र लिहून सावंत यांनी जाब विचारला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू

पुणे मराठा समाज मागास आहे का, याची चाचपणी करण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली असून आज पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू आहे. सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत सर्वेक्षण चाचणी बाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बैठकीत निकषांवर चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत या निकषांवर निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा;’ वाढदिवसाच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांच्या स्टेजवरुन सूचना!

सिल्लोड शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्ता यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात काही हुल्लडबाज करणारी तरुण मंडळीही होती. अब्दुल सत्तारांनी भर स्टेजवरून त्या मुलांना मारण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील एक व्हिडीओ अतुल पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार अपशब्दाचा […]