ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘राम मांसाहारी होते…’, आव्हाडांनी दिला ऐतिहासिक संदर्भ; भावना दुखावल्या तर खेद!

शिर्डी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल आपल्या भाषणात राम शिकार करून खात होते, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यभरात भाजपकडून त्यांच्याविरोधात तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागण्याची विनंती केली तर अनेकांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज जितेंद्र आव्हाड यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘मोदी-शाहांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे’

मुंबई केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंविधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कधीही हक्काने बोलवा हा भाऊ तुमच्यासोबत’, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई आज मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे. अनेकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही तर अनेकांना मिळणारं मानधन अत्यंत तुटपुंज्या स्वरुपातील आहे, असा आरोप अंगणवाडी सेविकांकडून केला जात आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणा अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कधीही हक्काने बोलवा हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोरोना झाल्यानंतर मला अवघ्या 2 तासात पालकमंत्रीपदावरुन काढलं, आव्हाडांनी वाचला अजित पवारांच्या कथित अन्यायाचा पाढा

मुंबई आजपासून दोन दिवस शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कार्यकर्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी माध्यमांसमोर जितेंद्र आव्हाडांनी आपली खदखद व्यक्त केली आणि अजित पवारांच्या कथित अन्यायाचा पाढाच वाचला. कोरोना काळात मला कोविडची लागणी झाली. त्यानंतर अवघ्या २ तासात मला पालकमंत्रीपदावरुन काढण्यात आलं. त्यानंतर तर किती मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली, मात्र त्यांचे पालकमंत्रीपद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

22 जानेवारी रोजी राज्यात दारू, मटण दुकानं बंद ठेवा – राम कदम

मुंबई २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. केंद्राकडून याची भव्य तयारी सुरू आहे. दरम्यान भाजप प्रवक्ता आणि आमदार राम कदम यांनी पंतप्रधान एकनाथ शिंदे यांना विनंती करणार पत्र पाठवलं आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील दारूची दुकानं आणि चिकन-मटणची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दिग्गज निघून गेल्यानं तुमचं प्रमोशन झालं’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणातील रखडलेल्या गृह प्रकल्पासाठी नरेंद्र पवारांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट

कल्याण गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृहप्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली. कल्याणजवळील आंबिवली गावात ‘रामराज्य’ आणि ‘स्वराज्य’ हे इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले आहेत. साधारणपणे दशकभरापूर्वी या गृह प्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल १ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळांचं सावित्रीबाईंना अभिवादन; पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांचा संताप

सातारा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह छगन भुजबळही सावित्रीबाईं फुलेंचं अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. ज्या मधुवादी विचारानं सावित्रीबाईंना त्रास दिला त्यांच्यासोबत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठ्यांचे सर्वेक्षण करून काय करणार? उद्या मराठा मागासवर्गीय ठरला तरी आरक्षण देणार कुठून? – हरिभाऊ राठोड

मुंबई मराठा आरक्षणाचा पेच दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होताना दिसत आहे. कायदेशीरदृष्ट्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणं शक्य नसल्याचं सांगितलं जात असताना ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळवून कसं द्यायचं हा मोठ्या प्रश्न राज्य सरकारसमोर उभा आहे. आरक्षण 50 टक्क्यांच्या वर देता येत नाही आणि ओबीसींना धक्काही लावता येत नाही या परिस्थितीमध्ये ओबीसीचे उपवर्गीकरण करणे हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा बळकावण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. या जागेवर पुनर्विकासाच्या नावाखाली व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरुन केला. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळची एक व्यक्ती विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकी देत असल्याचं आदित्य […]