ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दिग्गज निघून गेल्यानं तुमचं प्रमोशन झालं’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई

आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी जे गेले त्यांचं आभार माना, अशा शब्दात अजित पवार गटाला चिमटा काढला.

घराघरात राष्ट्रवादीचं अभियान राबवा, काही मतदारसंघात प्रामाणिक प्रयत्न झाल्याने अभियान घराघरात पोहोचलं. आपण राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात दौरा काढला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना पाडण्याचा विडा आता काही जणांनी उचलला आहे.

जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत अमोल डरने की बात नही… सगळा पक्ष ताकदीने तुमच्या मागे उभे राहील, अशा शब्दात जयंत पाटलांनी अजित पवारांना टोगा लगावला.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात