पाणीपट्टीत ८% दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा – दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने पाणीपट्टीत ८% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर आर्थिक ताण पडणार आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात लोटणे हा अन्यायकारक निर्णय असून, तो कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष एड अमोल मातेले यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते […]