X : @therajkaran
मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून सांगण्यात आली. पुण्यात असलेल्या भुजबळ यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आले. भुजबळ सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुजबळ यांची तब्येत गुरुवारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले. भुजबळ यांना नेमका होणारा त्रास सांगण्यात आला नाही. ते आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या दौऱ्याच्या तयारीत होते. सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली असता त्यांना मुंबईत दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांना विषाणू संसर्गामुळे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.