ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांनी दिला आणखी एक फॉर्म्युला, आता बॉल उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

मुंबई वंचित बहुजन आघाडीचा मविआमध्ये समावेश होणार की नाही याबाबत अद्याप काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून कोणीच ठोस भूमिका मांडलेली नाही. सुप्रिया सुळे आणि जयंत पवार यांनी फॉर्म्यूला ठरला असून त्यावर शिक्कामोर्तब बाकी असल्याचं सांगितलंय. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मविआला १२+१२+१२+१२ चा सर्व पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला दिला होता. मात्र यानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसत नाही’; जितेंद्र आव्हाडांची खदखद आली समोर

मुंबई अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची खदखद समोर आली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख करीत आपली भूमिका मांडली. सविस्तर मुलाखत ५ जानेवारी रोजी सर्वांना पाहता येणार आहे, मात्र त्यापूर्वी त्यातील काही अंश त्यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. अजित दादांचं बंड जिव्हारीअजित दादांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुढील 30 दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड, अंजली दमानियांचा दावा

मुंबई सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यात पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुढील ३० दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता असून यात काँग्रेस फूटेल, राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर मोठी घडामोड घडेल. भाजप काँग्रेसला फोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेल्या पत्रातील माहिती खोटी; गृहविभागाकडून स्पष्टीकरण

मुंबई राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडे एप्रिल 2023 पासून डीएनए किट्स उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. ही माहिती संपूर्णपणे खोटी असून, याबाबत गृहविभागाकडून खालीलप्रमाणे वस्तुस्थिती दिली जात आहे. 1) न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागांतर्गत काम करते आणि मुंबईसह एकूण 8 ठिकाणी डीएनए […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Big Breaking : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापूर्वीच मराठा आरक्षणाचा निर्णय? उद्या अध्यादेश निघणार?

मुंबई मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील शिवसेनेच्या 54 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर १० जानेवारी रोजी निर्णय घेतला जाणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या मराठा आरक्षणावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला जाऊ शकतो. कॅबिनेटनंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचं काम, नव्या मोटार वाहन कायद्याचा वडेट्टीवारांकडून निषेध

नवी दिल्ली केंद्र सरकारने आणलेला प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहन चालकांसाठीचा हा कायदा अत्यंत कठोर व जुलमी असल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अशोक चव्हाणांविरोधात मराठा समाज आक्रमक, गावाच्या वेशीवरच अडवली गाडी

नांदेड महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं असून २० जानेवारी रोजी मराठा बांधव मोठ्या संख्येने आंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाचा रोष सहन करावा लागत आहे. अशात काँगेस नेते अशोक चव्हाण हे एका कार्यक्रमासाठी गावात गेले असता तिथे मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी, करत त्यांना विरोध केला. नांदेड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘लवकरच ताठ मानेने मी..’; अमेय खोपकरांची नवी इनिंग, पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांच्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आज त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले, आणि लवकरच ताठ मानेने तुमच्यासमोर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अमेय खोपकरांचं ट्विटहिंदुजा रुग्णालयाचे निष्णात सर्जन, रुग्णालय कर्मचारी, माझे कुटुंबिय, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा – नाना पटोले

जुलमी काळा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन. मुंबई केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप […]