ताज्या बातम्या महाराष्ट्र

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान

ठाणे स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. दिघे साहेबानी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावे असा संदेश त्यांनी आजच्या तरुणाईला दिला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नववर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी द्यावी, फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?

मुंबई नागपूर विमानतळावर आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी फडणवीसांना नव्या वर्षाच्या टार्गेटसंदर्भात विचारलं. आधी फडणवीसांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, नवं वर्ष सर्वांना सुख-समाधानाचे जावो, हीच अपेक्षा. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्याच आमच्याही असतात. त्यामुळे नव्या वर्षात जनतेला त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात, ही ईश्वरचरणी […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. ताज्या बातम्या महाराष्ट्र

भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख लोकशाहीसाठी घातक; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत टीका […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Video : राहुल गांधींनी आईसोबत खास रेसिपी केली शेअर

नवी दिल्ली 2023 संपत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या बागेतून ताजी फळे घेऊन घरी संत्र्याचा जॅम तयार केला. ही रेसिपी राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांची आहे. राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर जॅम बनवण्याची प्रक्रिया अपलोड केली आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी आई सोनिया गांधींसोबत संत्र्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना निमंत्रण का नाही? आता राम मंदिराच्या पुजाऱ्यांनीच दिलं उत्तर

अयोध्या अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी मोठी जोमात सुरू आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि सीपीएमच्या नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं नाही. यावरुन संजय राऊतांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सोम्या-गोम्या’वरुन अजित दादा आणि संजय राऊतांमध्ये जुंपली!

मुंबई संजय राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत, आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर अजित पवारांनीही दिलेल्या उत्तरानंतर दोघांमध्ये जुंपली आहे. अजित पवारांना याबाबत विचारल्यावर, सोम्या-गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती. यानंतर संजय राऊतांनीही यावर जहरी टीका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई पुण्यातील मोतीबागेत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या भेटीची चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय काँग्रेस या प्रवेशाबाबत फारशी सकारात्मक नाही, असंच दिसून येतंय. त्यामुळे वंचितचा इंडिया आघाडीत कधी समावेश होणार, या चर्चांना अद्याप तरी पूर्णविराम मिळू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर सत्यजीत तांबेंच्या पाठपुराव्याला यश, शासनाने घेतला निर्णय

मुंबई विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आणि विजयी ठरलेले सत्यजित तांबे यांचं वेगळेपण त्यांच्या कार्यातून दिसतं. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी एक विषय लावून धरला होता, विशेष म्हणजे त्यात यशही लाभले आहे. आता योगासने खेळाडूंनाही शिवछत्रपती पुरस्कार तसेच राज्य शासनाच्या विविध सुविधा मिळणार आहे, यामागे सत्यजित तांबे यांचं मोठं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाहीच; नितीन करीर यांना लॉटरी

By Anant Nalavade  X : @NalavadeAnant मुंबई येत्या ३१ डिसेंबरला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ म्हणजेच लोकसभा निवडणुकीपर्यंत द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठविला आहे. असे जरी असले तरी केंद्र सरकार त्याला अनुकूल नसल्याची खात्रीलायक माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.   […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

PM Modi Ayodhya : ’22 जानेवारीला घराघरात दिवे लावा, दिवाळी साजरी करा’ – नरेंद्र मोदी

अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय हवाई तळ अयोध्या धामचं उद्घाटन केलं. यासोबतच १५,७०० कोटींच्या योजनांचं लोकर्पण आणि पायाभरणीदेखील केली. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतेने २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करीत आहेत. आज अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिराचं २२ जानेवारीला […]