महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कापणार!

पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण लोकसभा निवडणूक शर्यतीतून बाद X : @vivekbhavsar मुंबई: भारतीय जनता पक्षाने (BJP) आज राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघासाठी 46 निरीक्षकांची यादी जाहीर केली. या यादीत ईशान्य मुंबईतील भाजपाचे विद्यमान खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांचे नाव असून त्यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोटक यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र चूल की भाजपसोबत जाणार? आघाडीकडे चर्चेसाठी ४८ पैकी २६ जागांचा प्रस्ताव सादर

X : @therajkaran मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

महाराष्ट्र

आघाडीची बैठक गुरुवारी घ्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली. महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस दाखल

X: @therajkaran ठाणे: खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना “प्रवासी हाच आपला परमेश्वर” असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवसेनेचे कोल्हापूरात दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

X : @NalavadeAnant मुंबई: शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार, १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केले जाणार आहे. या राज्यव्यापी महाअधिवेशनाबद्दल माहिती देताना शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर म्हणाले की, २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे 

X: @NalavadeAnant मुंबई: पीक विमा योजनेच्या (crop insurance) अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ (DBT) मिळवून देणाऱ्या अन्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुरलीधरन, विजया रहाटकर यांना भाजपची उमेदवारी?; पार्थ पवारांनाही राज्यसभेची लॉटरी?

X : @vivekbhavsar मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. सहा पैकी पाच जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले आहे. विधानसभेचे सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतात. सध्या विधानसभेचे २८६ सदस्य आहेत. […]

जिल्हे

माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडली; कोल्हापूरात उपचार सुरु

X : @therajkaran धुळे: राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते त्यांच्या कन्येकडे कोल्हापूर येथे गेले असता त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवल्याने अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत […]