महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कापणार!

पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण लोकसभा निवडणूक शर्यतीतून बाद

X : @vivekbhavsar

मुंबई: भारतीय जनता पक्षाने (BJP) आज राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघासाठी 46 निरीक्षकांची यादी जाहीर केली. या यादीत ईशान्य मुंबईतील भाजपाचे विद्यमान खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांचे नाव असून त्यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोटक यांना लोकसभेचे तिकीट नाकारले जाईल, हे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांचे नाव इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असले तरीही मिहिर कोटेचा (MLA Mihir Kotecha) आणि प्रकाश मेहता यांचे नाव देखील स्पर्धेमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात असताना या दोघांकडेही अनुक्रमे बीड आणि उत्तर मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हे दोघेही लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीतून बाद झाल्याचे म्हटले जात आहे. चंद्रपूरचे माजी खासदार आणि केंद्रीय ओबीसी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर हे देखील चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्याकडे रावेरची जबाबदारी देण्यात आल्यामुळे अहिर देखील लोकसभेच्या स्पर्धेतून बाद झाले आहेत.

नवी मुंबईचे गणेश नाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चा होत्या. मात्र, नाईक यांच्याकडे भिवंडीचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्यामुळे नाईक देखील लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण यांच्याकडे अहमदनगरची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे ते देखील लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेतून बाद झाले आहेत.

भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत विद्यमान 14 ते 16 खासदारांना वगळून त्या ठिकाणी नवीन चेहरे देतील, अशी चर्चा आहे. पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार यांना लोकसभेत पाठवून विधानसभेत नवीन आणि तरुण चेहरे दिले जातील, अशीही चर्चा आहे. ज्या ज्येष्ठ आमदारांची नावे लोकसभेसाठी घेतली जात होती, त्यात पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण या नावांचा समावेश होता. मात्र त्यांच्याकडे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे हे नेते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, ही बाब स्पष्ट झाली आहे.

पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्याकडेही सोलापूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मोहोळ देखील स्पर्धेतून बाद झाले आहेत. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश सागर यांना गोपाळ शेट्टी यांच्या जागी उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र सागर यांच्याकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सागर यांचे नाव देखील या स्पर्धेतून बाद झाले आहे.

Also Read: मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात