महाराष्ट्र

पर्यावरण बदलाच्या योजनांसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा – मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधीच्या योजनांसाठी सखोल आणि नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी आणि हवा प्रदूषण नियंत्रण, नदी आणि तलाव संवर्धन यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी ठोस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, मंत्रिपद मिळणार का?

मुंबई – लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याआधीच राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे . जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच ठरलं ; पंकजा मुंडेंची विधान परिषदेसह मंत्रि‍पदी वर्णी लागणार ?

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचे( Vidhana Sabha)वारे वाहू लागले आहे , मात्र त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याकारणानं, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक (Vidhanparishad) जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी भाजपकडून 11 नावांची चर्चा सुरू असून यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या ” ; छगन भुजबळांचा पंकजा मुडेंना टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकमधून मी प्रीतम मुंडेंना उभी करेन असं वक्तव्य केल होत . त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांनी त्यांना तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

पाच वर्षांत कोणतंही पद नसताना पंकजा मुंडेंच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ, किती आहे पंकजा मुंडेंची संपत्ती?

बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन, काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

बीड- बीडच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणींची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना पदर पसरते, ही एक संधी आपल्याला द्या, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालंय. याचवेळी त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं आज शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे यांची लोकसभेतून माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटें (Jyoti Mete) या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या . पण आता या निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत अशी भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत घेतली आहे . त्यामुळे आता ज्योती मेटेंच्या उमेदवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

UP तील नेत्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडिओ, राज्यघटना बदलण्याच्या मुद्द्यावरुन मविआने भाजपला घेरलं!

मुंबई : उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते, परंतू देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर कडाडून टीका केली जात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“त्यांनी त्यांचं काम करावं मी माझं ….” ; पंकजा मुंडेंनी सोनवणेंच्या उमदेवारीवर बोलणं टाळलं !

मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे (Bajrang Manohar Sonwane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवर आता भाजपकडून रिंगणात असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . संपूर्ण निवडणुकीच्या काळात मी विरोधकांच्यावर काही बोलणार नाही ,त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करणार असं म्हणत त्यांनी […]