मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकमधून मी प्रीतम मुंडेंना उभी करेन असं वक्तव्य केल होत . त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांनी त्यांना तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या असे म्हणत टोला दिला आहे .
दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Manohar Sonwane) निवडणूक लढवत आहेत. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीका केली. तसेच या निवडणुकीत आपल्यासमोर खरे आव्हान कोणते आहे, यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.त्यांनी या मतदारसंघातुन प्रीतम मुंडेंना उमदेवार देण्याच्या केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे .
भुजबळ म्हणाले, पंकजा मुडेंनी बीडच्या निवडणुकीवर लक्ष द्यावं. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत ही अडचण नाही. उलट खूप उमेदवार आहेत, ही अडचण आहे. प्रत्येक पक्षाकडे चांगला उमेदवार आहे. प्रत्येक समाजाचा उमेदवार आहे. खूप आहेत इकडे उमेदवार, तुम्ही बीडवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करा. कुठल्याही परिस्थितीत निवडून या, असं म्हणत भुजबळांनी पंकजा मुंडेंना घरचा आहेर दिला आहे.