शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध
X: @therajkaran
मुंबई: गुजरातेतर (Gujtrat) राज्यांना सापत्न वागणूक दिली जात असून मी गुजरातच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. देशात सध्या एकाधिकारशाही सुरु असून प्रत्येक राज्यांचा सन्मान करताना केंद्र सरकार चालयला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. इतर राज्य केंद्रासमोर कटोरा घेऊन भीक मागण्यास उभे असल्याचे चित्र देशात होऊ देणार नाही. महाराष्ट्राला लूटून गुजरातला नेणाऱ्यांना नक्की रोखू. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक राज्याचा अधिकार त्यांना त्यांना सन्मानाने देणार असल्याचे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. शिवसेना उबाठा पक्षाचा (Shiv Sena UBT) गुरुवारी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते वचननाम्याचे पकाशन करण्यात आले. तर संजय राऊत देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची होणारी लूट थांबवणार असून शेतकÚयांना कर्जमूक्त करणार आहे. त्याचसोबत राज्यात पर्यावरणाला घातक पकल्प होऊ देणार नसलयाचे ठाकरे म्हणाले. बारसू, वाढवण, जैतापूर सारखे मानवी जीवनास घातक पकल्प महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचे घोषित केले. दरम्यान सध्या भाजपाची अवस्था विचित्र झाली असून पराभव समोर दिसू लागल्यावर ते ’राम राम‘ म्हणत आहेत. हा त्यांचा नेहमीचा उद्योग असून त्यातून ते गेली दहा वर्षे देशाची सत्ता भोगत आहेत. नोटाबंदी, ३७० कलम रद्द करताना आम्ही त्यांच्या सोबत होतो. आता त्याही पुढे जाऊन त्यांना घटना बदलण्यासाठी बहुमत हवे असल्याचे सांगत महाराष्ट्र लुटला जात आहे. शेतकÚयांना कर्जबाजारी केले जात आहे. गुजरातला आमचा विरोध नसून महाराष्ट्रातील होणारी लूट थाबिवण्याचे कार्य करायचे असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान केले. दरम्यान इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांनी जाहीरनामा जाहीर केले असून इंडिया आघाडीतील शिवसेना हा घटक पक्ष आहे. मात्र महाराष्ट्रासाठी प्राधान्याने शिवसेनेला हव्या असलेल्या गोष्टी या वचननाम्यात प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे ठाकरे म्हणाले. यावेळी शिंदेच्या सेनेला एकशिं पक्ष असा उल्लेख ठाकरे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भवानीच्या मंदिरात गेले नाहीत :
दरम्यान उद्धव ठाकरे हे राममंदिराच्या वेळी अयोध्येला आले नसल्याची टिका त्यांच्या विरोधकांनी त्यावेळी केली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी अयोध्येतील राम मंदिरात गेलो नसलो तरी त्यावेळी मी काळाराम मंदिरात गेलो होतो. मी गेल्यावर त्यांचे लोक काळाराम मंदिरात गेले होते. मात्र भवानी शब्दाला विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुळजापूर भवनीच्या मंदिरात अद्याप गेले नसल्याचे यावेळी आवर्जुन सांगितले.
शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा मुद्देः
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवा.
- शेतकर्यांना हमीभाव द्या.
- कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करा, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगा.
- शेतकर्यांना कर्जमुक्त करा, पीकविमाचे निकष बदला.
- बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करा.
- शेतकर्यांना गोदाम, शितगृह द्या.
- जिल्हा रुग्णालये अद्यायावत करा.
- ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करा.
- सरकारी नोकरीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा द्या, सुरक्षा द्या.
- महाराष्ट्राचे वैभव वाढविण्यासाठी वित्तीय केंद्र नवीनपणे उभारा, युवकांना नोकरीच्या संधी द्या.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा.
- उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करा, पर्यावरण स्नेही उद्योग आणा.
- सत्तेचं विकेंद्रीकरण करा.
- कर दहशतवाद थांबवा.