X: @therajkaran
महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येऊन दोन वर्ष झाले आहेत. असे असताना सुद्धा या सरकारने महिलांच्या सक्षमीकरण आणि नारी शक्तिसाठी अविरत काम केले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ .नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यात बोलतांना डॉ.गोऱ्हे यांनी सरकारने महिलांच्या संदर्भात केलेल्या कामाची माहिती दिली.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, खूप दिवसापासून रेंगाळलेले राज्याचे अद्ययावत चौथे महिला धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सूचनेुसार जाहीर केले.
लेक लाडकी ही योजना.- मुलींना लखपती करणार, महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सुट – २० कोटीपेक्षा जास्त प्रवासफेऱ्या, महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार सरकारने जाहीर केल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले .
जिल्हा वार्षिक योजनेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी १ टक्का निधी दिली असल्याची आठवण देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी करून दिली. १० लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद, महिला स्वयंसहाय्यता गटांना १५ हजार ऐवजी ३० हदार रुपये फिरत्या निधी देण्यात येणार आहे. रिसोर्स कम्युनिटी पर्सनला दरमहा आता ३ हजार रुपयांऐवजी ६ हजार रुपये मासिक मानधन, माता सुरक्षित तर घर सुरक्षित- ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार केला जाणार आहे.
आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आला आहे. १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची भरती सुरू केली जाणार आहे. इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या ७२ शासकीय वसतीगृहे सुरु करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. या सर्व योजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे कटिबध्द आहेत असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.