बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून बीडसह परिसरातील मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित प्रचार करताना दिसतायेत.
बीडमध्ये मविआचं शक्तिप्रदर्शन
बीडमध्ये दुपारी दीडच्या सुमारास पंकजा मुंडे अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर बीड शहरात भाजपाच्या वतीनं रॅली काढण्यात येणार आहे. दुपारच्या सुमारास जाहीर सभाही पार पडणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले पंकजा यांच्या या शक्तिप्रदर्शनात उपस्थिती लावणार आहेत.
मराठा मतांसाठी उदयनराजे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाा परिणाम बीड, जालन्यासह मराठवाडा आणि राज्यातील इतर काही मतदारसंघांमध्ये जाणवणार आहे. शरद पवारांनी बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी ही लढत होताना दिसतेय. अशात जातीवर निवडणूक होऊ नये, असं आवाहन पंकजा सातत्यानं करताना दिसतायेत. त्यामुळेच आजच्या त्यांच्या शक्तिप्रदर्शनात उदयनराजेंची उपस्थिती ही महत्त्वाची मानण्यात येतेय.
हेही वाचाःराज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, कुठे आहे मतदान, काय तयारी?