X : @NalavadeAnant
मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad) यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
जरांगे नवे नटसम्राट……
जरांगे – पाटील (Manoj Jarange-Patil) हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत. रोज उठतात आणि आपली भूमिका बदलतात. रोज नाटक करतात, आजारीपणात मला असं झालं, मला तसं झालं असे सांगतात, मुंबईच्या दिशेने निघतात, पुन्हा युटर्न घेतात आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात. हे साफ चुकीचे असून आता समाजही याला खपवून घेणार नाही, असेही लाड यांनी यावेळी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस हे एकटेच ब्राह्मण समाजाचे पूर्णवेळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कायम मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ही सल कुठेतरी मराठा समाजातील शरद पवार (Sharad Pawar) यांना टोचते आहे आणि त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप आ. लाड यांनी केला.
जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. जे मुद्दे त्यांचे असतात तेच मुद्दे जरांगे – पाटीलचे देखील असतात. त्यामुळे यामागे आमचा थेट आरोप आहे की, शरद पवार यांची ते तुतारी वाजवत आहेत, असा दावा आ. लाड यांनी केला.
Also Read: मुंबई महापालिका : कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत राखीव जागांसाठी