माढा लोकसभा मतदारसंघावरुन वादंग, भाजपाच्या निंबाळकरांना रामराजे, मोहितेंचा विरोध, तर धैर्यशील मोहिते मविआकडून इच्छुक?
मुंबई- माढा लोकसभा मतादरसंघावरुन राज घराण्यातील संघर्ष उफाळून आलेला दिसतो आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या पहिल्या यादीत रणजीतसिंहं नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या उमेदवारीला अजित पवार राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी आधीच विरोध केला होता. त्यांना यात मोहिते पाटील यांची साथ मिळालीय. शेकापचे जंयत पाटील यांच्या उपरस्थितीत काही दिवसांपूर्वी याबाबत बैठक पार पडली […]