ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड

बारामती आताची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकली आहे. यापूर्वीही गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या बारामती येथील प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केल्याचं समोर आलं होतं. यावेळी पाठवलेल्या नोटीसमध्ये ७२ तासांत प्लांट बंद करण्याच्या सूचना देण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अमोल डरने की बात नही…’; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

X : @therajkaran मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. घराघरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा थेट शरद पवारांवर हल्ला, PAP घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप

X : @therajkaran मुंबई पीएपी घोटाळा: किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजना घोटाळ्यात म्हणजेच पीएपी घोटाळ्यात गंभीर आरोप केले आहेत. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहिद बलवा आणि पवार यांच्या निकटवर्तीय चोरडिया यांना याचा फायदा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एक हजार ९०३ सदनिका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यांच्या हाताला रामभक्तांच्या खुनाचे रक्त : आ.ॲड.आशिष शेलार

X : @NalvadeAnant मुंबई राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले, त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेले असताना त्यांच्याशीच हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, असा थेट व खळबळजनक आरोप मुंबई भाजपा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसत नाही’; जितेंद्र आव्हाडांची खदखद आली समोर

मुंबई अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची खदखद समोर आली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख करीत आपली भूमिका मांडली. सविस्तर मुलाखत ५ जानेवारी रोजी सर्वांना पाहता येणार आहे, मात्र त्यापूर्वी त्यातील काही अंश त्यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. अजित दादांचं बंड जिव्हारीअजित दादांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई पुण्यातील मोतीबागेत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या भेटीची चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय काँग्रेस या प्रवेशाबाबत फारशी सकारात्मक नाही, असंच दिसून येतंय. त्यामुळे वंचितचा इंडिया आघाडीत कधी समावेश होणार, या चर्चांना अद्याप तरी पूर्णविराम मिळू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितसह मविआला हव्यात 76 जागा, राज्यात फक्त 48; कसा सुटणार लोकसभा जागावाटपाचा तिढा?

मुंबई राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहे. राज्यात भाजप सरकारला चिथावणी देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि आता वंचितला सोबत घेऊन लोकसभेची (Loksabha Election 2024) तयारी करण्याचा प्लान आखताना जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. चारही पक्ष आपला आकडा घेऊन मैदानात उतरलेत, मात्र प्रत्यक्षात लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या जागा ४८.. अशा परिस्थितीत जागा वाटप कसं होणार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

शरद पवार आणि उद्धव ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार की नाही?

मुंबई 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत एकत्र येणार आहेत. दरम्यान या सोहळ्याला उबाठा गटाचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पवार घराण्याच्या नव्या वारसदाराची राजकारणात एन्ट्री?

बारामती शरद पवारांनंतर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू रोहित पवार आणि पार्थ पवार राजकारणात सक्रिय आहेत. आता पवार घराण्याचा नवा वारसदार सक्रिय राजकारणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव राजकारणात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ते अजित दादांसोबत न जाता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपनं काढलं ‘धनगर’ कार्ड, बारामतीत पवारांना घेरण्याचा प्रयत्न, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी

बारामती भाजपकडून शरद पवारांना बारामतीत घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा बदल केला आहे. भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या 31 वर्षांपासून बारामती मतदारसंघ पवार कुटुंब जिंकत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही सुरक्षित सीट मानली जाते. शरद पवार येथून 6 वेळा, […]