ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘निर्मला सीतारमण यांचा वैचारिक गोंधळ उडालाय, गेल्या 10 वर्षात देशात 7 IIT, 7 IIM कधी उघडले?’ महिला नेत्याचा सवाल

मुंबई X : @MeenalGangurde8 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात भाजप सरकारच्या योजनांबद्दल अपडेट दिली. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर आता एक महिला नेत्याने निर्मला सीतारमण यांना सवाल उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पावेळी सीतारमण म्हणाल्या, की सरकारने गेल्या १० वर्षात देशात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CID व EOW क्लोजर रिपोर्ट तरी राजकीय सूडबुद्धीने रोहित पवारांवर ED ची कारवाई, पक्षाकडून घंटानाद आंदोलनाची घोषणा

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने २४ जानेवारी रोजी रोहित पवारांची चौकशी केली होती. ही चौकशी ही राजकीय सुडापोटी असून कारखाना लिलावाच्या बाबतीत सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला असतानाही केवळ राजकीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी २०२३ मध्ये शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभा जागावाटपाचं गणित सुटणार? महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक

मुंबई लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोण किती जागांवर निवडणूक लढवणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआत आल्यास हा गुंता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मविआच्या या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, अटकेची शक्यता?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. याशिवाय ईडी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. रोहीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP MLA Disqualification : बंद कपाटातील महत्त्वाची कागदपत्रं गहाळ? आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांना दिलेल्या उत्तरामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाडांची उलटसाक्ष नोंदवण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी

मुंबई राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! एकाच दिवसात मविआच्या दुसऱ्या नेत्याला ईडीकडून नोटीस

मुंबई आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी मविआच्या नेत्यांना मोठा दणका दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काही तासांपूर्वी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स जारी केलं आहे. एकाच दिवसात मविआच्या दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘न्यायव्यवस्थेतील आरक्षणा’बाबत जितेंद्र आव्हाडांची स्पष्ट भूमिका, पुन्हा नवा वाद?

मुंबई सोसायटीत माझ्या आईला कधीच पुजेला बोलवत नव्हते, माझी आई घरात एकटीच बसून असायची; असं म्हणताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चातुवर्ण व्यवस्थेवर बोट ठेवले. काही दिवसांपूर्वी राम मांसाहार करीत असल्याच्या वक्तव्यावरुन राज्यभरातून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आव्हाडांचं वक्तव्य वादात सापडलं आहे. यावेळी आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं, तटकरेंना गाडायचंय’, शरद पवार म्हणाल्याचा ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

गुहागर ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचंय, सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, त्याचमुळे त्यांनी ठाकरेंकडे माझ्या नावाची शिफारस केली, असा […]