एकीकडे आमदार अपात्रतेची टांगती तलवार, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार बारामतीत
बारामती आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आजपासून शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. १५, १६ आणि १७ फेब्रुवारीपर्यंत शरद पवार बारामती मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानंतर १८ तारखेला शरद पवार पुरंदर दौऱ्यावर आहेत. […]








