ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवं पक्ष चिन्ह ‘तुतारी’सह शरद पवारांचं रायगडावर शक्तिप्रदर्शन

रायगड केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवं पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज शरद पवार रायगडावर शक्तिप्रदर्श केलं. यावेळी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे. रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी महाराजांची 394 वी जयंती, शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शासकीय सोहळ्याचं आयोजन

शिवनेरी आज १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सध्या राज्यभरातील वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

12 ते 19 फेब्रुवारीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ‘स्वराज्य सप्ताह’

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यभरात दिनांक १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून १२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ तर समारोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिंदे – फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजाला झुंझवत आहेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….! मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत असल्याचा गंभीर आरोप करतानाच, राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत, अशा संतप्त शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?’

मुंबई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलं वाघनख हे शस्त्र भारतात आणलं जाणार असल्याचं आश्वासन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी दिलं होतं. मात्र नवीन वर्ष उजाडलं तरी अद्याप महाराष्ट्रात वाघनखं आली नसल्याने विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई कोणीही वेगळी करु शकणार नाही : अजित पवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे […]