राहुल गांधी म्हणाले, हुकूमशाहीचा खरा चेहरा समोर, काँग्रेसने सांगितली सूरतमधील भाजपच्या विजयामागील क्रोनोलॉजी
नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल सोमवारी (22 एप्रिल) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आता काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या यशाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं […]