Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis speaking in the Assembly on action against illegal foreign nationals and law enforcement measures. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अवैध विदेशी नागरिकांवर कारवाई कडक; महाराष्ट्रातही अंमलबजावणी सुरू – फडणवीस

मुंबई: शैक्षणिक आणि वैद्यकीय व्हिसावर भारतात येऊन कालावधी संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तर तासात भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी नालासोपारा परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा आणि त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग याबाबत प्रश्न उपस्थित केला. “अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विदेशी नागरिक […]

Education Minister Dadaji Bhuse addressing the Maharashtra Assembly amid uproar over alleged irregularities in the mid-day meal scheme across 86,000 aided schools. महाराष्ट्र ताज्या बातम्या

८६ हजार शाळांच्या पोषण आहार योजनेत गैरव्यवहार? विधानसभेत गदारोळ; एसआयटी चौकशीची मागणी

मुंबई : राज्यातील तब्बल ८६ हजार अनुदानित शाळांमधील पोषण आहार योजनेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. संतप्त विरोधी सदस्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या मुद्द्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना, “अनियमितता झाल्याचे आढळल्यास सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” अशी घोषणा केली. ही लक्षवेधी सूचना आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मांडली होती. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री […]

Maharashtra Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil speaking in the Assembly on excessive water usage and lack of recycling by Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी महापालिकांना विखे पाटील यांचा इशारा; पाणी पुनर्वापर न केल्यास कारवाई

मुंबई: पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत असून पाणी पुनर्वापर (रिसायकलिंग) करत नसल्यामुळे कृषी क्षेत्रावर अन्याय होत आहे, असा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही महापालिकांना खणखणीत इशारा दिला. “महापालिकांनी तातडीने आपल्या पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल,” असे स्पष्ट शब्दांत मंत्री विखे […]