ताज्या बातम्या महाराष्ट्र

रवींद्र वायकर यांचे नाव भारतीय कामगार सेनेच्या बोर्डावरुन मिटवले

X: @therajkaran मुंबई: शिवसेना आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. ज्या सेनेतून मोठे झाले त्याच सेनेला विसरून गट बदलत असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वायकर हे जोगेश्वरी मतदार संघातील असल्याने त्याच मतदारसंघात येणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार […]

ताज्या बातम्या विश्लेषण

खाजगी सर्वेक्षणाचा अहवाल; बंडखोर शिंदे गटातील आमदारांना जनता नाकारेल?

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदारसंघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांकडून मतदारसंघात खाजगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात या बंडखोर आमदारांना जनतेने कौल नाकारल्यानचे निकाल येत असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीचे नैराश्य आले असून या चिंतेने शिंदे गटातील आमदारांना ग्रासले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव सेनेला निमंत्रणच नाही

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नोंदवला आक्षेप Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या कळीच्या मुद्यावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय विशेष बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीला अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. अगदी आर पी […]

अपात्रता सुनवाई : शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये अस्वस्थता

Twitter : @milindmane70 मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदारसंघ सोडून दोन दिवस आधीच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा […]

विश्लेषण

शिशिर धारकरांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार?

Twitter : @milindmane70 मुंबई रायगड जिल्ह्यातील पेण चे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांनी ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला (Shishir Dharkar joins UBT Shiv Sena). बँक घोटाळ्यातील आरोपीला उद्धव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या […]