प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी, मंत्री विजयकुमार गावित, खा. हिना गावित यांच्या प्रयत्नांना यश
नंदुरबार बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्ययअग्रक्रम समितीची रुपये ७९३.९५ कोटी किंमतीची म्हणजे सुमारे 800 कोटी रुपयांची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश […]
