भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यासोबत मुंबईतील बैठकीदरम्यान चर्चा. महाराष्ट्र ताज्या बातम्या

बोगस नोंदणीवर आता फौजदारी गुन्हे; बांधकाम कामगारांच्या लाभ वितरणात मोठे बदल  

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतील गैरव्यवहार रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बोगस नोंदणी करणारे कामगार, बनावट प्रमाणपत्र देणारे ठेकेदार आणि बेकायदेशीर एजंट यांच्याविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर वस्तूरूपी लाभ बंद करून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यासह अनेक प्रशासकीय सुधारणांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.   […]

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा आणि योग्य वेतनाची मागणी करणारे अशासकीय विधेयक समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभेत सादर केले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी कल्याण मंडळाची मागणी; रईस शेख यांचे विधानसभेत अशासकीय विधेयक

मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या गिग आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेत कार्यरत असलेल्या लाखो कामगारांना सामाजिक सुरक्षा, योग्य वेतन आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी विधानसभेत “महाराष्ट्र गिग आणि प्लॅटफॉर्म (ऑनलाईन) कामगार हक्क आणि संरक्षण विधेयक, २०२६” हे अशासकीय विधेयक सादर केले. या विधेयकाद्वारे राज्यात गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याची, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म […]