ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  

X : @therajkaran नागपूर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा (amendment in ceiling act) करण्यास विधिमंडळाची मान्यता आज मिळाली आहे. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-2 म्हणुन वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग-1 करणे शक्य होणार आहे. यामुळे खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा : मंत्री मंगल प्रभात लोढा 

X : @NalavadeAnant नागपूर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान बुधवारी येथे दिले. अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी आज सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली : विजय वड्डेटीवार 

X : @NalavadeAnant नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोना काळात (corona pandemic) तारले होते. मात्र, विद्यमान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आ. प्रविण दरेकर यांचा सुषमा अंधारेंच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव?

X : @NalavadeAnant नागपूर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात केलेल्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. कोणतीही शहानिशा न करता उपसभापतींचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Breach of Privilege motion) दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विरोधकांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध आंदोलन

नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी विविध विषयांवरुन संताप व्यक्त केला. संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाज, ओबीसी समाज… जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी शासन सकारात्मक : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

X : @therajkaran नागपूर राज्यात स्वतंत्र तालुके निर्मितीसाठी होत असलेल्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक आहे. मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावी, याचा आकृतीबंध निश्चिती करण्यात आला आहे. तालुका निर्मिती अभ्यासासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या (Konkan Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पोक्सो’गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा : उपसभापती नीलम गोर्‍हे 

X : @therajkaran नागपूर  अल्पवयीन युवती अत्याचार आणि ‘पोक्सो’सारख्या (POCSO act) गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा अन् या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले.  या संदर्भात ‘तात्काळ कार्यवाही केली जाईल’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]

ताज्या बातम्या मुंबई

उर्दू भवनावरून विधानसभेत धार्मिक – भाषिक वाद

X : @therajkaran नागपूर  मुंबईतील आग्रीपाडा येथील भूभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) कडून काढून उर्दू लर्निग सेंटर उर्दू भवन (Urdu Bhavan) उभारण्यासंदर्भातील लक्षवेधी धार्मिक आणि भाषिक वाद-प्रतिवादावरून प्रचंड वादग्रस्त झाली.  रईस शेख, नितेश राणे यांचे आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ पक्षाच्या सदस्य स्थानिक आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी आक्रमकपणे या भूभागावर उर्दू लर्निग सेंटर होणे हा प्रस्ताव […]

ताज्या बातम्या मुंबई

ठाण्यात तरुणीला मारहाण; चर्चा करा: अंबादास दानवे

X : @NalavadeAnant नागपूर ठाण्यात तरुणीला (Thane incident) गाडीने जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आल्याने पीडित तरुणीवर सर्वच स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी मंगळवारी सदर तरुणीला न्याय मिळावा, या मागणीसाठी २८९ अनव्ये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली.  एमएसआरडीसी (MSRDC) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे बळीराजाचे सरकार आहे : कृषीमंत्री धनंजय मुंडे

X : @NalavadeAnant नागपूर ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विरोधकांना मंगळवारी ठणकावून सांगितले.  विधान परिषदेत नियम ९७ […]