मुंबई

भाजपकडून गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

Twitter : @NalavadeAnant

मुंबई
महायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे.

मुंबईतील भाजप नेते खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली. वरळी जांबोरी मैदानावरील दहीहंडीचे पहिले बक्षीस ३ लाख ३३ हजार रुपये आहे. तर विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.

मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. यंदाही भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. मुंबईतील यंदाची दहीहंडी परिवर्तनाची असेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव