कल्याणात संत शिरोमणी रवीदास जयंती उत्सव साजरा
कल्याण – भक्ती चळवळीतील महान संत संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. संत शिरोमणी रवीदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश
रवीदास महाराज यांनी समाजातील असमानता, भेदभाव आणि अनिष्ट रूढी परंपरांवर प्रखर टीका केली. त्यांनी आपल्या श्लोक आणि भक्तीगीतांतून सामाजिक जागृती घडवली. त्यांचे विचार आजही 648 वर्षांनंतर प्रेरणादायी ठरत आहेत, असे नरेंद्र पवार यांनी सांगितले.
संविधानामुळे समान अधिकार
पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या योगदानावरही प्रकाश टाकला. संविधानामुळे गरीब आणि श्रीमंतांना समान अधिकार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
कार्यक्रमात वैद्यकीय, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील रोहिदास समाजाच्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड, एसीपी कल्याणजी घेटे, आयोजक भैरवनाथ वाघमारे, महिला अध्यक्षा मंगल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.