ठाणे –“मी, माझा समाज, माझं कुटुंब, माझा जिल्हा यांच्यावर सातत्याने वैयक्तिक आरोप झाले. २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालली. मात्र आम्ही द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही,” अशा ठाम शब्दांत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
सकल वंजारी समाज अधिवेशन ठाण्यात पार पडले. यावेळी मुंडेंनी अनेक महिन्यांनंतर आपला संयम दाखवत जोरदार भाषण केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जात पाहून कधी राजकारण केलं नाही. ज्या दिवशी करावं लागेल, त्यादिवशी राजकारण सोडून देईन.”
गुणवत्तेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ जात पाहून लक्ष्य केल्याचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला – “आता बास! यापुढे सहन करणार नाही.”
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील वंजारी समाजातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी “एकोप्याने चालूया” असा संदेश दिला