मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जीवा महाले यांच्या स्मरणार्थ प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या जागेत हे स्मारक उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिलशाही सेनापती अफझलखानाची छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रतापगडावर ऐतिहासिक भेट झाली होती. त्या प्रसंगी अफझलखानाचा विश्वासू शरीररक्षक सय्यद बंडा याने शिवाजी महाराजांवर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी वीर जीवा महाले यांनी पुढे येत छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले. त्यांच्या या पराक्रमाची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर जीवा महाले स्मारकाच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. या स्मारकामुळे प्रतापगड परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनदृष्ट्या महत्त्व आणखी वाढेल.
१० नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवप्रेमी प्रतापगडावर येतात. वीर जीवा महाले यांच्या स्मारकामुळे त्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे देसाई म्हणाले.
शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून वीर जीवा महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.


https://bilivideos.cc
July 9, 2026That is a great ttip particularly too thoze fresh
too the blogosphere. Brief bbut very accurate information… Thanks ffor sharing ths one.
A mut read article! xnxx