महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मराठीचा गळा घोटू देणार नाही” — काँग्रेसचा भाजपला इशारा

मुंबई – महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय हा मराठी विरोधी असून, तो त्वरित रद्द न केल्यास काँग्रेस पक्ष सडकून विरोध करेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

शनिवारी मुंबईतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “भाजप आणि संघाचा हेतू म्हणजे संविधानातील आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांचा अस्त करून केवळ हिंदीच लादणे. पण काँग्रेस मराठीचा गळा घोटू देणार नाही. हिंदीचा अपमान न करता आम्ही तिच्या सक्तीला विरोध करतो. मराठी ही आमची भाषा नसून जीवनशैली आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयाविरोधात काँग्रेसने साहित्यिकांना पत्र पाठवले असून, काही संस्था आणि संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. “हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही, तर संस्कृतीचा लढा आहे. त्यामुळे यासाठी कोणाचं निमंत्रण लागणार नाही. आम्ही सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, “गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच ती का? एकच पक्ष असूनही दोन राज्यांत वेगवेगळ्या धोरणांचा आधार कसा घेतला जातो? भाजपचा हा दुटप्पीपणा आहे.”

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत, ‘बंच ऑफ थॉट्स’ या संघप्रेरणांवरील पुस्तकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात