By योगेश त्रिवेदी
मुंबई : कुळगांव-बदलापूर मेडिकल असोसिएशन या डॉक्टर्सच्या संघटनेचा वार्षिक सांगीतिक कार्यक्रम नुकताच बदलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध कलाप्रदर्शनातून संगीताचा मनमुराद आनंद घेतला.
या मैफिलीचा विशेष आकर्षण ठरला अवघ्या पाच वर्षांचा युग दिलीप मानगेकर. त्याने आपल्या गोड आवाजात सादर केलेले ‘है अपना दिल तो आवारा’ हे हेमंत कुमार यांचे अजरामर गीत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोलहवा साल’ या चित्रपटातील या गाण्याच्या भावपूर्ण सादरीकरणाने ज्येष्ठ श्रोत्यांची मने जिंकली.
गाण्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात युगचे ‘छोटा हेमंतकुमार’ म्हणून विशेष कौतुक झाले. आजोबांच्या काळातील गीत छोट्याशा मुलाने इतक्या आत्मीयतेने सादर करणे, ही रसिकांसाठी एक अविस्मरणीय संगीतमय अनुभूती ठरली.