राऊत यांच्याही पेक्षा करणार मोठं शक्ती प्रदर्शन…!
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे येत्या शुक्रवार दि.१९ ,एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भाजप प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी ‘मविआ ‘तर्फे आपला उमेदवारी अर्ज कालच मोठं शक्ती प्रदर्शन करत दाखल केला.
गेले अनेक दिवस या मतदारसंघातून राऊत यांच्या विरोधात उमेदवार कोण यावर उलट सुलट चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपच्या श्रेष्ठींनी दहा दिवसांपूर्वीच पक्षातर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी मतदार संघात येऊन प्रचार कार्याला धूमधडाक्यात सुरुवातही केली आहे.
रत्नागिरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या वतीने मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातून शेकडो वाहने आणि कार्यकर्ते, उपस्थित रहाणार आहेत.