ताज्या बातम्या विश्लेषण

कोकण पदवीधर मतदारसंघ : ठाकरेंच्या माघारीवरून शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यांचा पर्दाफाश…..

X : @NalawadeAnant

मुंबई – कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघडीतला (Maha Vikas Aghadi) काँग्रेसचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार किशोर जैन यांनी माघार घेतल्याची अधिकृत घोषणा ठाकरे यांचे खास विश्वासू नेते, पक्षाचे प्रवक्ते व राज्यसभा खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. ही घोषणा इतक्या सहजासहजी झालेली नसून जैन यांना उमेदवारी देण्यामागे उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून ज्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी हे सर्व घडवून आणले, त्यांच्याच पर्दाफाश उध्दव यांच्याच एका जवळच्याच नेत्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना केला.

खरंतर लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर होण्याआधी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एस. चेंनिथला यांनीच खुद्द उध्दव ठाकरे यांना पदवीधर मतदारसंघ (Konkan Graduate constituency) कॉँग्रेसला देण्याबाबत स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे साधारणतः जानेवारी, फेब्रुवारीपासूनच काँग्रेसचे (Congress) माजी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष रमेश कीर (Ramesh Keer) यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेत व नाराज नेत्यांची मनधरणी करत दिवसरात्र मेहनत घेत जवळपास पालघरपासून ते सिंधुदूर्ग अशा पाच जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. यातून त्यांनी आजघडीला तब्बल सव्वा लाखाच्यावर पदवीधरांची नोंदणी केली आहे. याची कल्पना कीर यांनीही उध्दव ठाकरे यांना ऐन लोकसभा निवडणूकीत मोतोश्री निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले असताना दिली होती.

त्यातच १० जून रोजी होणारी विधानपरिषदेची निवडणूक राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाहता २६ जून पर्यंत ढकलण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. मात्र लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर उध्दव यांनी सहकुटुंब आपला दौरा परदेशी हलवल्याची संधी साधत ठाकरे यांच्या शिवसेनेतीलच दोन मातब्बर व विश्वासू नेत्यांनी खुद्द उद्धव ठाकरे यांनाच अंधारात ठेवून किशोर जैन यांच्याशी मोठी ‘डीलिंग’ करत जैन यांच्या पदरात उमेदवारी टाकली. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी एस.चेंनिथला यांचा संताप अनावर झाल्याने खुद्द त्यांनीच उध्दव ठाकरे यांच्याशी बातचीत केली. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी रात्रीच मातोश्रीवर राऊत यांना बोलावून घेत चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले.

त्याप्रमाणे ठाकरे यांचे विश्वासू, प्रवक्ते, व खा. संजय राऊत यांच्याकरवी ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन उमेदवारी मागे घेत असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यास काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने भाग पडल्याची सुरस माहितीही याच नेत्याने दिली. मात्र त्याबदल्यात नाशिक शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनेही आपला अधिकृत उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली.

९० हजारांची नोंदणी येणार अंगाशी..

किशोर जैन यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा करतेवेळी खा. संजय राऊत यांनी किशोर जैन यांनीही तब्बल ९० हजार पदवीधरांची नोंदणी केल्याचा दावा केला. मग काँग्रेसने दावा केल्याप्रमाणे त्यांची सव्वा लाख नोंदणी व उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची खा. राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे ९० हजार असेल आणि अशावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदानावेळी काही दगाफटका झालाच तर तर ते केवळ खा. राऊत यांच्या अंगाशीच येऊन थांबणार नाहीत तर त्याचे पडसाद येणाऱ्या विधासभा निवडणुकीतही तीव्रतेने उमटण्याचीशक्यताही या नेत्याने बोलून दाखवली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी