मुंबई

सुतगिरणीला निधी मंजूर, तरीही बच्चू कडू नाराज; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ जागा लढवणार!

X : @vivekbhavsar

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळूनही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना स्वत:च्या सुतगिरणीसाठी शासनाचा हिस्सा असलेला निधी मंजूर करून घेता आला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने सतत नाराज असलेल्या बच्चू कडू यांच्या सुतगिरणीला विद्यमान महायुती सरकारने विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल मंजूर केले. तरीही बच्चू कडू तिसऱ्या आघाडीकडून (Third Front) महायुती आणि महाविकास आघाडिविरोधात उमेदवार देणार आहेत. आठ जागा मागणारे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती (Prahar Janshakti Party) ही पार्टी चार जागी लक्ष केंद्रित करणार आहे.

बच्चू कडू यांच्या पूर्णामाय या सुतगिरणीला भागभांडवल मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), वित्त मंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (Textile Minister Chandrakant Patil) यांनी विशेष लक्ष घातले. एका मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मंजुरीला आला नाही, त्यामुळे बच्चू कडू अधिकच नाराज झाले, अखेर दुसऱ्या बैठकीत (Cabinet Meeting) हा विषय घेऊन दोन आठवड्यापूर्वी कडू यांचा राग शांत करण्यात आला.

या निर्णयामुळे बच्चू कडू महायुतीची (Maha Yuti) साथ सोडणार नाही, असे वाटत असतांना बच्चू कडू यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांचा सुराज्य पक्ष आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा स्वाभिमान शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) यांच्या सोबत हात मिळवणी करून तिसरी आघाडी उभारून विधान सभा निवडणुकीत महायुती आणि माहविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

कडू यांच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यचालपूर (जि अमरावती) याच मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. मेळघाटमधून पक्षाचे विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून (Raver Assembly Constituency) अनिल चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. अनिल चौधरी हे भुसावळचे (Bhusawal Assembly Constituency) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधु आहेत. पक्ष फुटीनंतरही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत राहिलेले संतोष चौधरी यांना पक्षाने लोकसभेत तिकीट नकरल्याने ते कॉँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक (Assembly elections 2024) लढवण्याची शक्यता आहे. तर त्यांचे बंधु अनिल चौधरी हे प्रहार पक्षाचे रावेरमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यातील आकोटमधून अनिल गावंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आकोटमधून (Akot Assembly Constituency) भाजपचे प्रकाश भरसाखले निवडून आले. त्यांना २६.६ टक्के मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावरील वंचित बहुजन आघाडीचे (VBA) संतोष रहाटे यांना २२.६ तर प्रहारचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार गावंडे यांना १५.४ मते मिळाली होती. पराभूत झाल्यानंतरही अनिल गावंडे गेले पाच वर्षे सातत्याने मंतदारांशी संपर्कात असून कामे करत आहेत. ही त्यांची जमेची बाजू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीसोबत असल्याचा निव्वळ देखावा आहे, ते यांचेच आहेत आणि आमच्या सोबतच राहतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्त केला.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव