धाराशिवमध्ये पाच नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर ₹1 कोटीपर्यंत बोली लावल्याच्या आरोपावरून राजकीय वाद महाराष्ट्र ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये पाच नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राजकीय संघर्ष; ₹1 कोटीपर्यंत ‘बोली’चा ठाकरे गटाचा आरोप

शहरात ‘एक कोटींचा गद्दार’चे बॅनर; पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान मुंबई: धाराशिव नगरपरिषदेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक राजकारण तापले आहे. पक्षांतरामागे आर्थिक आमिष असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून, पक्ष बदललेल्या नगरसेवकांनी राजीनामा देऊन पुन्हा मतदारांचा कौल घ्यावा, अशी […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘मराठी माझी — संवाद भाषा’ कार्यक्रमात मराठी भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेबाबत बोलताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठीची सक्ती नव्हे….; तर ‘भक्ती’च्या बळावर महाराष्ट्राची सांस्कृतिक एकजूट…!

एक लाखाहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले; भाषिक अस्मितेला विकास आणि सामाजिक समावेशकतेशी जोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न Anant Nalawade ठाणे  — महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषा हा केवळ भावनिक मुद्दा राहिलेला नाही; तर तो आता सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक समावेशकता आणि राजकीय स्वीकारार्हतेचा नवा पट बनत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सोमवारी  “मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा” […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे आणि विसर्जन मार्गांच्या तयारीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘खड्डे क्लिअर’ मास्टरप्लॅन

महापालिकांना अल्टिमेटम; विसर्जन मार्गांसह शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश! चांगली कामगिरी करणाऱ्या पालिकांना पुरस्कार; निष्काळजी पालिकांच्या कामगिरीची नोंद निधी देतानाही घेतली जाणार….! मुंबई  — गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील महापालिकांना थेट कामाला लावले. गणेशोत्सव सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मिरवणूक मार्ग, विसर्जन […]

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी शिकवणी अभियानांतर्गत अमराठी व्यावसायिक चालकांना मराठी प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

१ लाख चालक शिकले मराठी; भाषा अभियानाला मोठा प्रतिसाद, सरकारचा दावा

“मराठीचा मान राखणाऱ्याला महाराष्ट्र कवेत घेईल”; १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन, १७ ऑगस्टला समारोप मुंबई : राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. राज्यभरातील एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे […]

Former Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan addressing the controversy over remarks against Deputy Chief Minister Sunetra Pawar. महाराष्ट्र अन्य बातम्या

सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवरून पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका स्पष्ट; “महिलांविषयी अवमानकारक भाषा टाळली पाहिजे”

बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न विचारणे योग्य; सरकारने उत्तर द्यावे, मोदींच्या वक्तव्यांचीही केली आठवण मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेल्या वादावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांविषयी अशा प्रकारचे अवमानकारक शब्दप्रयोग टाळले पाहिजेत, असे स्पष्ट करतानाच त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नांना […]

Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde speaking to the media on the controversy over remarks against Deputy Chief Minister Sunetra Pawar. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही”; सुनेत्रा पवारांवरील टिप्पणीवरून शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका करत या प्रकरणाला महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अपमान आहे. महिलांचा अवमान […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्यायी मार्गाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांसोबत बैठकीत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाणे मेट्रो प्रकल्पावरील विरोध कमी करण्यासाठी सरकारचा संवादाचा मार्ग; जनजागृती, चर्चासत्रे आणि मार्गाच्या फेरअभ्यासाचे शिंदेंचे निर्देश

स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करण्यावर भर; पर्यायी मार्गाचाही तीन आठवड्यांत अभ्यास मुंबई: ठाणे शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाविरोधात काही भागांत वाढत असलेल्या स्थानिक आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच पुढील कामकाज करण्याचे निर्देश दिले. प्रकल्पासंदर्भातील गैरसमज दूर […]

Students examine examination papers as policymakers, officials and journalists discuss the national examination paper leak controversy against the backdrop of the Indian Parliament, symbolising governance, accountability and public concern. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याच्या लेखाची चर्चा; एकनाथ शिंदेंच्या मौनामुळे वाढल्या राजकीय चर्चा

मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या लेखामुळे महायुतीत कोणता संदेश, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा मुंबई : देशभरात नीट (NEET)सह विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असताना, दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रीय सहसमन्वयक व प्रसारमाध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी लिहिलेल्या “पेपरफुटी ही केवळ प्रश्नपत्रिकेची नव्हे, तर लाखो […]

Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde extends birthday greetings to Chief Minister Devendra Fadnavis through an official social media post. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘बिग डी’चा वाढदिवस आणि शिंदेंच्या शुभेच्छांची चर्चा; महायुतीत नव्या संकेतांची चर्चा?

फडणवीसांविषयी शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव; राजकीय वर्तुळात विविध अर्थ लावले जात आहेत मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून दिलेल्या शुभेच्छा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. शुभेच्छांमध्ये वापरण्यात आलेली आदरयुक्त, आत्मीय आणि गौरवपूर्ण भाषा ही केवळ औपचारिक शुभेच्छा आहे की त्यामागे काही व्यापक राजकीय संदेश दडलेला आहे, […]

Supreme Court hearing related to the Shiv Sena parliamentary group dispute and notice issued to six MPs. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे-शिंदे संघर्षाला नवे वळण; सहा खासदारांना नोटीस

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायालयीन छाननी; दोन आठवड्यांत भूमिका मांडण्याचे निर्देश मुंबई: महाराष्ट्रातील शिवसेनेतील फुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन संघर्षाला बुधवारी नवे वळण मिळाले. ठाकरे गटाशी संबंधित सहा खासदारांनी स्वतंत्र संसदीय गटाची मान्यता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी दाखल याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित खासदारांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट […]