महाराष्ट्र ताज्या बातम्या

अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड 

मुंबई: नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणार्‍या सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात ३०० गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली. 

सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून गेली चार वर्षे केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान केले जात आहे. मात्र यंदाही दिवाळीनिमित्त अन्नमित्रचे सर्वेसर्वा संजय सोमनाथ शेटये यांनी पुढाकार घेत ३०० गरीबांची दिवाळी गोड करण्याचे कार्य केले.

 या सत्कार्यासाठी राजेश सोनावडेकर, भारतेंदु तिवारी, दिलीप कदम, संभाजी कदम, संदीप शुक्ला, सुलभा गोरिवले, अनन्या गुरव, नुरूर खानोलकर, सुजाता परब, दर्शना पाटील यासारख्या अनेक दात्यांनी सढळ हस्ते फराळाचे साहित्य देऊन सहकार्य केले. 

सौरभच्या या सत्कार्याला माजी महापौर महादेव देवळे, रणजीपटू सिद्धेश लाड, मुंबई पोलीस दलातील अशोक शिरसाट, वसंत खामकर, अनिल बोंग यांनीही प्रत्यक्ष उपस्थिती दाखवत गरीबांना फराळाचे वाटप केले. या दिवाळी फराळासोबत किरण शेट्टी आणि सुनीता कोटियन यांनी १२५ महिलांना साड्याही वितरित केल्या.  

चिमकुल्यांनी पिगी बँकेतले पैसे दिले फराळाला अन्नमित्रच्या सत्कार्याला ज्येष्ठ श्रेष्ठांसह चिमुकल्यांनीही मदतीचा हात देत नवा पायंडा पाडला. नम्रता पाटोळे आणि शलाका पाटोळे यांच्या घरातील चिमुकल्या शैवी पाटोळे आणि श्रीशा पाटोळे यांनी आपल्या आई-बाबांकडून केले जाणारे सत्कार्य पाहून अन्नमित्रच्या फराळासाठी आपल्या पिगी बँकेत जमा झालेले सर्व खाऊचे पैसे दिले. चिमुकल्यांचे हे दान पाहून उपस्थित पाहुण्यांनी दोघींचे कौतुक केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात