नाशिक: शेतकरी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांचे हक्क केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने २६ डिसेंबर २०२४ रोजी नाशिकमध्ये शेतकरी महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे.
परिषदेत शेतजमिनीवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमांना मान्यता आणि योग्य मोबदला, महिलांवरील अन्याय-शोषण, स्वच्छतागृहाचा हक्क आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. शेतकरी महिलांच्या हक्क व मागण्यांची सनद या परिषदेत संमत केली जाणार आहे.
परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील संघटनांमधील महिला नेतृत्वांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
महत्त्वाचे मार्गदर्शक आणि प्रमुख उपस्थिती:
• उद्घाटन: मरियम ढवळे (राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना)
• प्रमुख उपस्थिती: सीमा कुलकर्णी (मकाम संघटना नेत्या)
• विशेष मार्गदर्शन: डॉ. अशोक ढवळे (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा)
प्रमुख उपस्थित नेते आणि कार्यकर्ते:
• जे. पी. गावीत (माजी राज्य अध्यक्ष, किसान सभा)
• डॉ. डी. एल. कराड (राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीटू)
• नसीमा शेख, प्राची हातिवलेकर (जनवादी महिला संघटना)
• सरिता शर्मा (शेतमजूर युनियन)
• रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ (एस.एफ.आय.)
• दत्ता चव्हाण, नंदू हाडळ (डी.वाय.एफ.आय.)
जनवादी महिला संघटना, सीटू, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. आणि डी.वाय.एफ.आय. या संघटनांचे सहकार्य परिषदेच्या आयोजनासाठी लाभले आहे.