महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी हेल्पलाइन व मराठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा : वोडाफोनला शिवसंचार सेनेचे निवेदन

मुंबई : मोबाईल सेवा पुरवठादार वोडाफोन कंपनीने ग्राहक सेवा देताना मराठी भाषेचा वापर करावा, तसेच मराठी भाषिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी शिवसेना (ठाकरे गट)च्या शिवसंचार सेनेकडून वोडाफोन कंपनीला निवेदन देण्यात आले.

शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी वोडाफोन कंपनीचे नोडल हेड श्री. दास यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले. त्यात मराठीतून हेल्पलाइन सेवा सुरु करावी आणि मराठी भाषिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी काही दिवसांपूर्वी एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठीत संवाद साधण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर एअरटेल कंपनीने दिलगिरी व्यक्त करत मराठीतून ग्राहक सेवा देणारी हेल्पलाइन सुरु केली होती.

वोडाफोन कंपनीनेही तत्काळ मराठी भाषिक ग्राहकांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरु करावी, अशी आग्रही मागणी शिवसंचार सेनेने केली आहे. यामुळे मराठी तरुणांना रोजगार मिळेल आणि ग्राहकांना मातृभाषेत संवाद करता येईल, असे अखिल चित्रे यांनी सांगितले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात