महाड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) नवीन प्रभाग रचनेनुसार आणि २७% ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषदेची (Raigad Zilla Parishad) सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना व सदस्यसंख्या वाढविण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा आहे. यापूर्वी ओबीसी आरक्षणामुळे मे २०२१ पासून निवडणुका रखडल्या होत्या. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने नवीन प्रभाग रचनेचे आदेश काढले होते. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेबाबत दाखल याचिकाही न्यायालयाने आज फेटाळली.
रायगड जिल्हा परिषदेची नवी सदस्यसंख्या (६६):
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये पुढीलप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यसंख्या ठरली आहे –
- पनवेल – ९, कर्जत – ६, खालापूर – ५, सुधागड – २, पेण – ६, उरण – ५, अलिबाग – ८, मुरुड – २, रोहा – ५, तळा – २, माणगाव – ५, महस्ळा – २, श्रीवर्धन – २, महाड – ५, पोलादपूर – २.
राज्यातील महापालिका (Municipal Corporation), नगरपालिका (Municipal Council) आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.