मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णयामुळे जीएसटी-२ हे धोरण देशाच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी तसेच सामान्य ग्राहकांच्या हितासाठी आणि नवीन पिढीला बळ देणारे ठरणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
रायगड जिल्ह्यातील निजामपूर, रोहा आणि माणगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची सोमवारी भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून, या क्रांतिकारी निर्णयामुळे लोकांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे तटकरे यांनी नमूद केले.